गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना
यानुसार खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्याने किंवा त्याच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्याकडे स्वतंत्ररीत्या विमा हप्त्याची रक्कम भरण्याची गरज नाही. हा हप्ता महाराष्ट्र शासनामार्फत भरण्यात आला आहे. वरील प्रमाणे अपघात झाल्यास विमा कालावधीत किंवा विमा कालावधी संपल्यानंतर हि ९० दिवसापर्यंत विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करता येईल.
कोणाला मिळणार लाभ : पात्रता
१.मुख्य व्यवसाय शेती असावा.
२. शेती स्वतःची असावी.
३. शेतकर्याचे वय १० ते ७५ वर्षापर्यंत असावे.
कागदपत्रे :
१. शेतीचा ७/१२
२. नमुना ८ अ
३. आधार कार्ड
खालीलपरिस्थितीमध्ये मिळणार लाभ :
पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा इतर कारणाने विषबाधा, रस्ता किंवा रेल्वे अपघात, विजेचा धक्का, वीज पडल्याने, खून, पडल्याने मृत्यू ,सर्प किंवा विंचू दंश, नक्सलवादी हल्ला, हिंस्र प्राण्यांचा हल्ला, दंगल इत्यादी कारणामुळे मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ मिळेल.
विम्यासाठी कुठे करायचा संपर्क :
१.नजीकचे कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी
२. विमा सल्लागार कंपनी
योजने संबंधित शासन निर्णय बघण्यासाठी डाउनलोड बटन वर क्लिक करा.
विमा कालावधी ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ साठीच्या माहितीसाठी व सल्लागार कंपन्यासाठी खालील डाउनलोड बटन वर क्लिक करा.
सर्व प्रकारच्या योजनांची माहिती व योजनाचे अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.