प्रधानमंत्री फसल बीमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित पिक विमा योजना राज्यात २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या ३ वर्षाकरिता मृग व आंबिया बहारासाठी अनुसूचित फळ पिकांसाठी फळ पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे.
फळ पिकांचे शेती उत्पादनात महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांचे आर्थिक सामर्थ्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने शासनाने पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिकविमा योजना संपूर्ण राज्यासाठी येत्या तीन वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. ह्या योजनेत एकूण ८-९ फळ पिकांचा विमा फळांच्या दोन हि हंगामात म्हणजे मृग व आंबिया बहारातही काढता येणार आहे.
पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिकविमा योजना मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब , चिकू , पेरु, लिंबू , सीताफळ व द्राक्ष (क) या ८ फळ पिकांसाठी २६ जिल्यांमध्ये तर आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब ,आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोजक तत्वावर स्ट्रोबेरी व पपई या 9 फळपिकांसाठी 30 जिल्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्याचा प्रस्ताव पास झाला आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूलता यामुळे फळ पिक शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ठ आहे.
केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. उत्पादनक्षम वयापेक्षा कमी वयाच्या फळबागेची विम्यासाठी नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण नष्ट करण्यात येईल.
अनुसूचित फळ पिकांचे उत्पादनक्षम वय खालीलप्रमाणे आहे.
फळ पिक निहाय हवामान धोके व मिळणारे विमा संरक्षण :
कधी करता येणार अर्ज :
डाळिंब बागेच्या मृग बहारासाठी पीकविम्याचा अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै
योजनेच्या सविस्तर माहितीसाठी योजनेचा सरकारी जी आर बघण्यासाठी यथे क्लिक करा :
सर्व प्रकारच्या योजनांची माहिती व योजनाचे अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.
मो. क्रमांक : +918830530872