Type Here to Get Search Results !

राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना

 


योजनेबद्दल : 

     अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कृषीयंत्रिकरणाचा लाभ पोहोचवणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे . यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांची शेतीविषयक काम अधिक सुखकर आणि सोयीची करण्यासाठी हि योजना राबवण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला जमीन सुधारणा, पूर्वमशागत औजारे, आंतरमशागत यंत्रे ,पेरणी व लागवड यंत्रे ,पीक संरक्षण  औजारे, काढणी व मळणी औजारे इत्यादी अनेक शेतीची काम जलद करून देणारी यंत्रे विकत घेण्यासाठी अनुदान देऊन अर्थसहाय्य  करण्यात येते . कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.

उद्देश : 

 
१. ज्या ठिकाणी शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
२. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

या साठी 

 
कृषि यंत्र - अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे, प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य दिले आहे .
राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% तर इतर शेतकऱ्यांना ४०% कृषी यांत्रिकीकरणाला अनुदान देणार आहे.

खालील कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते .

  1.   ट्रॅक्टर
  2.   पॉवर टिलर
  3.   ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  4.   बैल चलित यंत्र/अवजारे
  5.   मनुष्य चलित यंत्र/अवजारे
  6.   प्रक्रिया संच
  7.   काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
  8.   फलोत्पादन यंत्र/अवजारे
  9.   वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  10.   स्वयं चलित यंत्रे
 

आवश्यक कागदपत्रे :

  1. आधार कार्ड
  2. ७/१२ उतारा
  3. ८ अ दाखला
  4. खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  5. जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  6. स्वयं घोषणापत्र
  7. पूर्वसंमती पत्र

 अधिक माहितीसाठीखालील लिंक वर क्लिक करा:



सर्व प्रकारचे ओनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.