Type Here to Get Search Results !

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

 


 

 योजनेबद्दल :

        जमिनीत ओलावा टिकवून राहावा आणि शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती  योजना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहे . या योजनेमुळे कोरडवाहू  शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत मिळणार असून पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे पाणी स्वतःच्या शेतात करायला मदत मिळणार आहे .

        या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. 

सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. 

 कोणाला मिळणार लाभ : पात्रता
  1. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  2. लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  3. जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  4. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  5. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  6. लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
  7. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही. 

पात्रतेच्या आटी व अधिक माहितीसाठी  खालील संकेत स्थळाला भेट द्या.

महा डीबीटी  

शासन निर्णयासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना  

 

सर्व प्रकारचे ओनलाईन अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.