Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

 


योजनेबद्दल

    जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. 
    या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ :

  • १. लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  • २. लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • ३. जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  • ४. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  • ५. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  • ६. लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
      अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा : महा डीबीटी 

प    पीडीएफ स्वरुपात माहितीसाठी क्लिक करा  : डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना 
      
      सर्व प्रकारचे  online फॉर्म्स भरण्यासाठी भेट द्या / संपर्क करा :


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.