Type Here to Get Search Results !

एम फील - पी एच डी च्या विद्यार्थ्यांकरिता बार्टीचे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (BANRF - फेलोशिप ) ऑनलाईन अर्ज सुरु (फेलोशिप)

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक, सामाजिक प्रतिकूल परिस्थितीवर  मात करून उच्च शिक्षनासाठी 107 वर्षांपूवी सन 1913 साली कोलंबिया विद्यापीठात गेले होते. या ऐतिहासिक घटनेस लक्षात घेऊन सन 2013 पासून “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रावृत्ती  (BANRF)” महाराष्ट्र सरकार कडून सुरु करण्यात आली. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील एम. फील. व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता प्रोत्साहन व आर्थिक सहाय्याच्या स्वरुपात  अधिछात्रावृत्ती  देण्याकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या साठीची पात्रता खालील प्रमाणे आहे.

1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

2. अर्जदार अनुसूचित जातीचा असावा.

3. दिनांक  01 जानेवारी  2019 ते 31डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित विद्यापीठात  एम. फील. व पीएच.डी. करिता नोंदणी असलेले विद्यार्थी BANRF- 2019 अधीछात्रवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात तसेच 01जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान संबंधित विद्यापीठात  एम. फील. व पीएच.डी. करिता नोंदणी असलेले विद्यार्थी BANRF- 2020 अधीछात्रवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात

4. अर्जदार एम. फील. व पीएच.डी. करिता नोंदणी केल्या नंतर कोणत्याही प्रकारे खाजगी व्यवसाय  किंवा खाजगी / सरकारी नोकरी द्वारे आर्थिक उत्पन्नाचा लाभ घेतलेला किंवा घेत नसावा.

5. अर्जदार कोणतीही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा/घेत नसावा.

योजनेच्या अधिक माहितीसाठी पी डी एफ डाउनलोड करा.

BANRF जाहिरात 

अधीछात्रवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा.

अधीछात्रवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करा 

बार्टी च्या संकेतस्थळाला भेट द्या.

बार्टी


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies