जेष्ठ नागरिकांमध्ये वयानुसार येणाऱ्या विविध आजारांमध्ये सहाय्य म्हणून बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधने प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार द्वारे हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दृष्टी दोष, दात गळणे, चालता न येणे अश्या समस्यांमध्ये सहायक ठरणारी उपकरणे पुरविली जाणार आहेत. जसे : श्रवण यन्त्र, व्हील चेयर, चष्मा, चालण्याची काठी इत्यादी.
आणखी साहित्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
पात्रता :
बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिक जे वयाशी संबंधित कोणत्याही अपंगत्व किंवा अशक्तपणामुळे पीडित आहेत.
कमी दृष्टी, श्रवण कमजोरी, दात गळणे आणि लोकोमोटर अपंगत्व यात सहाय्यक अशी उपकरणे प्रदान केल्या जातील जे त्यांच्या शारीरिक कार्यामध्ये त्यांना सामान्यतेच्या जवळ नेऊ शकतील. या योजनेचा देशभरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.
आवश्यक कागदपत्रे :
१. ओळखपत्र
२. रेशन कार्ड
३. आधार कार्ड
४. शारीरिक दृष्ट्या असमर्थ असल्याचे प्रमाणपत्र किंवा डॉक्टरांचा अहवाल
५. पासपोर्ट फोटो
६. मोबाईल नंबर
अधिक माहितीसाठी :
Online अर्ज करण्यासाठी :
सर्व प्रकारचे online अर्ज भरण्यासाठी संपर्क करा.